Tuesday, June 26, 2012

अपेक्षां मुळे दुख:

Everyone Expect So many things from Life…..

जय गुरूदेव
जीवनात इच्छा आकांशा करू नये असे नाही.... पण जेवढी जास्त मोठी अपेक्षा तेवढ मोठ दुखः असत मनुष्याच !!
मुलांकडून अपेक्षा, बायकोकडून अपेक्षा, नवरया  कडून अपेक्षा, हा असा बोलला पाहिजे, तो तसा वागला पाहिजे, त्यानी मला हे सांगितल पाहिजे, ह्याने असे म्हटले पाहिजे, ती हसली पाहिजे, तिने हे केल पाहिजे ह्या सगळ्या अपेक्षां मुळेच मानुस अतिशय दुखी: होउन जातो. पण याला दुख: म्हणत नाही...
जर वेगळ्या नजरेने बघितले तर दुख हे नाहीच आहे मुळात..... नुसत्या निव्वळ अपेक्षा आहेत, आपल्या अपेक्षाच आपल्याला दुख: देतात.
काही नैचुरल कलेमिटिज  मुळे, एक्सीडेंट मुळे, काही  शारीरिक कमीपना मुळे अथवा कोणी हाल करून शारीरिक  त्रास दिल्यामुळे होणारे दुख: ते शारीरिक दुख: असते आणि त्यामुळेच मन पण दुखी: होते......सुख अणि दुख: आहे किंवा नाही हे मनावर अवलम्बुन असते, मानले तर दुख:  नाही तर सुखच सुख.......यालाच म्हणतात 
 "Accepting the Moment as It I or as Happening is the Secrete of Happiness....."

 
Be happy always – Happiness is within you..!

आणि आपण किती सुखी आहोत ना!!! सुंदर शरीर मिळालेय, सुंदर संसार, चांगले आई-वडिलयोग्य संस्कार, चांगले साथी- मित्रसुंदर घर-दार  सगळ व्यवस्थित असुनही आपण काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी मुळे दुख: करीत बसतो.
तो देव बाप्पा किती बिचारा त्रस्त असेल ना ?? म्हणत असेल की कसे  लोक आहेत हेमनाप्रमाने सगळ मिळाले असुनही कम्प्लैंट्स करतात, आशा- अपेक्षा असाव्यात पण त्या पूर्ण नाही झाल्या तर त्यामुळे दुःख करीत बसु नये....हसत पुढे चालत राहावे.....
जगात सगळ्यात सोपी आहे  ते नेहमी खुश राहणे, हसत राहणे! पण तेच कुणाला जमत नाही, कारण सगळे उगीचच डोक्यावर ओझे घेउन बसलेले असतात; जेव्हा की आपल्या हातात काहीच नसते सगळ काही त्याच्या श्रीहरीच्याच  हातात असते...

 
He always Carry you, when you are in Trouble..!

एक गाने आहे :
~तेरा रामजी करेंगे बेडा पार, उदासी मन काहेको करे………काहेको करे रे काहेको डरे......
~
सहज किनारा मिल जाएगा, परम सहारा मिल जाएगा;  डोरी सौप के तो देख एक बार.
 उदासी मन काहेको करे.
~
नैया तेरी राम हवाले.. लहर -लहर हरी आप संभाले,
~तेरी हार भी नही है तेरी हार उदासी मन काहेको करे........

याचा मतितार्थ असा की जर तू सच्चा आहेस, सेवाभावी आहेस, प्रेमळ आहेस  तर तुज्या डोळ्यातून जे अश्रु निघतात ते तुझे नाहित तो त्याची काळजी जरुर घेत्तो म्हनून आपण बिनधास्त रहायचे, सगळे कर्तव्य करून, खुश रहायचे, सतत हसत रहायचे..... आणि सगाल्यांवर खुप प्रेम करायचे....
(तुका म्हणे हसतची रहावे जे- जे होइल ते ते पाहावे)
हे जीवन कित्ती छोटे आहे, उदया काय  होणार हे कुणालाच माहिती नाही मग कशाला राग, द्वेष, भाण्डंन, वाद....... आनंद व प्रेमच सगळ्याना हवे असते ना....
जर आजु-बाजुच्या लोकांमध्ये, लहान मुलांमध्ये, दुबले, गरीब, गरजू यांच्यामध्ये आपण देव बघू शकत नाही तर तो देव आपल्याला एका निर्जीव मूर्ति मध्ये कसा दिसेल बरे.....
तो सगळ्याना बरोबर बघतो आणि न्याय ही करतो, प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळ भोगाविच लागतात...... 
जीवन हे आपल्याच कर्मांचा लेखाजोखा असते.....जसे कर्म तसेच जीवन आपल्याला मिळते.......
जरी आपण देखा-देखि, परमपरेच्या नावाखाली, अजागरूक पणे  काही चूका करीतही असलो तरीजेव्हा जाण आली(म्हणजे जाणीव झाली), जागरूकता आली, तेव्हा जो  सावरतो व सन्मर्गाला लागतो त्याच्या च जीवनाचे उच्चाटन व्हायला सुरुवात होते...
मनुष्य आणि दुसरे जिव यातला फरक मनुष्याने समजायला हवा..... जाणीव(जागरूकता) अणि ज्ञान ही मनुष्याची लक्षणे आहेत..... 
जेव्हा जाग आली तेव्हाच सावरने हे ज्ञानी माणसाचे लक्षण आहे.

 
Meditation is the Best Prayer

माणसाने साधना (योग व ध्यान) आणि  आराधना (प्रार्थना) मात्र कधीच सोडू नए..त्याचीच तर तो प्रभु वाट बघत असतो आतुरतेने..!! की कधी हे लोक प्रेमाने माझे नाव घेतात, आनंदाने, भक्ति भावाने माझे गुन-गान करतात....

देव कोणत्या तरी माध्यमाच्या करावी त्याची कामे करीत असतो व शिक्षा हि देतो. घाबरायचे च असेल तर फक्त त्याला घाबरायचे. आपले प्रत्येक कर्म त्याला अर्पित करावे, जसे काही तो आपल्या कडून हे कार्य करवून घेतो आहे. प्रत्येक काम (Non-Doorship ), तो करतोय म्हंटल्या वर यश - अपयश सगळे त्याचेच. मग ना हि  आपल्याला अति दु:ख होत ना हि अति आनंद व ना हि गर्व कि हे मी केलेय....
आपण प्रत्येक कर्म त्याला अर्पित करून श्रद्धेने प्रार्थना केली कि आपले  प्रोब्लेम्स तो सोडवितोकृपेची- प्रेमाची अमूल्य भेट मिळते, कृपेचा वर्षाव होतो..भीती पळून जाते....
आणि स्वताचे असे काय आहे आपल्या जवळ? हे शरीर जे आपण माझे माझे म्हणतो ते पण तर आपले नाही, या निसर्गाने दिलेय व तिथेच परत जाणार आहें नाही का??
ना शरीर, ना संसार, ना लोकं, नाती-गोती पैसा सगळ-सगळ त्याचेच तर दिलेल आहे, त्याने ठरवलं आहे आपल्या साठी म्हणून मिळाले आहे हे आपल्याला. पैसा पण आपला नाही, धन-दौलत हि आपली नाही.काही वर्ष जो पर्यंत हे शरीर आहे आपण हा पैसा, हे घर- दार सांभाळणार.... बरोबर ना?? आणि त्याने दिलय तर त्याला हे पण माहिती आहे कि याला कसे जपायचे..तुझी काळजी पण तोच घेतो वेळो-वेळी.
काम हि पण एक पूजा आहे हे विसरायचे नाही, पण स्वताला वेळ देणे पण विसरायचे नाही कारण स्वतः SELF म्हणजेच तो परमेश्वर आहे (अहं ब्रम्हा:स्मी..शिवोहम - याचा अर्थच तो आहे).
त्या विधात्याचे स्वरूप शुद्ध आनंद आहे, आनंदी राहायचेध्यान - एक पूजा आहे -हे रोज करायचे.... खूप प्लान्स, खूप अजेंडाज  घेऊन ध्यानाला बसायचे नाही.. म्हणून मग विचार येतात व ध्यान नीट होत नाही.
ध्यानाला बसले कि स्वताला सांगा "आता या क्षणाला मी कुणीही नाही, मला काहीही नको व मला काहीही करायचे नाही"   या प्रमाणे अगदी बिनधास्त, आरामात बसायचे सगळी काम, व्याप, काळजी त्याच्यावर सोपवून बसायचे ध्यानाला.. म्हणजे बघ ध्यान कसे होते व तू कुठे पोहोचतोस ते..
आपल्या मधल्या कमी काढण्या साठी पण त्यालाच हाक मारायची, सांभाळ रे बाबा, माझी लाज तुझ्या हातात(तुम मेरी राखो लाज हरी), मला कसेही करून या कमीपानातून बाहेर काढ.
जेव्हा माणूस देवाजवळ आपल्या साधेपणाने व निर्मळ मनाने शरण जातो त्याच्या जीवनात तो पहलेपेक्षा जास्त स्पीड ने प्रगती करतो....कारण तेव्हा देव त्याच्या पाठीशी असतो... हे नेहमी लक्षात ठेवा.

हरी हा प्रेमाचा आणि भक्तीचा भुकेला आहे….हे खरे आहे…..१००% खरे आहे…!!
अपेक्षा करायचीच आहे तर ती देवा कडून करावी!! त्याच्या प्रेमाची, भक्तीची, त्याच्या कृपेची....रागवायचे पण असले तर ते त्याच्यावरच की मी तुझ्यावर इतके प्रेम करूनही तू माझ्या वर रुसला आहेस... का देवा??
लोकांकडून अपेक्षा करने म्हणजे दु:खाला आमंत्रण देने आहे....!! 
आणि अपेक्षा केलीही तरी ती पूर्ण न झाल्यास दुख: करने हा मुर्खपणा आहे........
गुरु, देव आणि आत्मा हे एकच आहेत म्हनून कधीही स्वताला एकटे समजू नये परमेश्वर सतत आपल्या हृदयत असतो..... काही पण असो आधी त्याला सांगावे, त्याच्याशी बोलावे, त्याच्याशी गुंजन करावे (मेडिटेशन म्हणजे एक तन्मयताच आहे), आनंदी राहावे- आनंद हेच त्याचे स्वरुप आहे, तो तुझ्यावर खुप प्रेम करतो - सतत करतो !!
GOD is Beyond our Imagination and Beyond Everything….


स्व:ताची काळजी घेणे, साधना करने, सतत आनंदी राहने, सेवा करने ही पण एक पूजाच  आहे.
असे लोक सतत प्रगतीच करतात कारण परमेश्वर त्याना साथ देतो.
जय गुरुदेव
आनंदी रहा, आनंदच द्या..................